उत्पत्तीच्या काळातील लोक इतकी वर्षे का जगत?

प्रश्नः उत्पत्तीच्या काळातील लोक इतकी वर्षे का जगत? उत्तरः उत्पत्तीच्या आरंभीच्या अध्यायातील लोक इतकी वर्षे का जगत हे काहीसे रहस्य आहे. बायबलच्या विद्वानांद्वारे अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. उत्पत्ती 5 मधील वंशावळ शेथच्या नीतिमान वंशजांची वंशरेखा नमूद करीते — अशी वंशरेखा ज्यात शेवटी ख्रिस्ताचा जन्म होणार होता. शक्यतः देवाने ह्या वंशाच्या नीतिमत्वाचे व त्यांच्या आज्ञाधारकपणाचे…

प्रश्नः

उत्पत्तीच्या काळातील लोक इतकी वर्षे का जगत?

उत्तरः

उत्पत्तीच्या आरंभीच्या अध्यायातील लोक इतकी वर्षे का जगत हे काहीसे रहस्य आहे. बायबलच्या विद्वानांद्वारे अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. उत्पत्ती 5 मधील वंशावळ शेथच्या नीतिमान वंशजांची वंशरेखा नमूद करीते — अशी वंशरेखा ज्यात शेवटी ख्रिस्ताचा जन्म होणार होता. शक्यतः देवाने ह्या वंशाच्या नीतिमत्वाचे व त्यांच्या आज्ञाधारकपणाचे फळ म्हणून विशेष दीर्घायुष्य देऊन त्यांना आशीर्वादित केले. हे स्पष्टीकरण शक्य असले तरीही, बायबलमध्ये कोठेही दीर्घायुष्य उत्पत्तीच्या 5व्या अध्यायात उल्लेख केलेल्या व्यक्तीपुरते विशिष्टरित्या मर्यादित केलेले नाही. याशिवाय, उत्पत्ती 5 हनोखावाचून दुसया कोणत्याही व्यक्तीचा विशेषरित्या नीतिमान म्हणून उल्लेख करीत नाही. ही शक्यता आहे की त्या काळातील प्रत्येक जण कित्येक शेकडो वर्षे जगत असावा. यासाठी अनेक कारणे असली पाहिजेत.

मनुष्याचे आयुष्य कमी होईल असे काहीतरी महाप्रलयाच्या वेळी घडले असावे. महाप्रलयापूर्वीच्या आयुष्याची (उत्पत्ती 5:1-32) महाप्रलयानंतरच्या आयुष्याशी तुलना करा (उत्पत्ती 11:10-32). महाप्रलयानंतर वय लगेच, नाट्यपूर्णारित्या कमी झाले आणि मग कमी होत राहिले. किल्ली उत्पत्ती 6:3 मध्ये असावीः “परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्याठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही : तो देहधारी आहे; तथापि ती त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” अनेक लोक “एकशेवीस वर्षांच्या” उल्लेखास मनुष्याच्या वयावर देवाने ठरविलेली नवीन मर्यादा म्हणून पाहतात. मोशेच्या काळापर्यंत (जो 120 वर्षे जगला) आयुष्यमान फार कमी होते. मोशेनंतर कोणी 120 वर्षांपेक्षा अधिक काळ जगल्याचे लिहिलेले नाही.

उत्पत्तीच्या काळातील लोक इतकी वर्षे का जगलीत याविषयी एक सिद्धांत ह्या कल्पनेवर आधारित आहे की पाण्याच्या महिरपाने पृथ्वीस वेढलेले असे. महिरप (कॅनपी) सिद्धांतानुसार, “अंतराळावरच्या” जलाने (उत्पत्ती 1:7) हरितगृहाचा प्रभाव उत्पन्न केला होता आणि आज पृथ्वीस प्रभावित करणाऱ्या किरणोत्सर्गास थोपवून धरले होते, ज्याचा परिणाम आदर्श राहणीमानात झाला होता. महाप्रलयाच्या वेळी पाण्याचा महिरप पृथ्वीवर कोसळून पडला (उत्पत्ती 7:11), ज्यामुळे आदर्श वातावरण संपुष्टात आले. आज बहुतेक उत्पत्तीवाद्यांनी (क्रिएशनिस्ट) महिरप सिद्धांताचा अस्वीकार केला आहे.

दुसरा विचार हा आहे की, उत्पत्तीनंतरच्या पहिल्या काही पिढ्यांत, मनुष्याच्या ..आनुवंशिक संकेतात (जेनेटिक कोड) मध्ये काळी दोष उत्पन्न झाला होता. आदाम आणि हव्वेस सिद्ध असे उत्पन्न करण्यात आले होते. त्यांच्यात निश्चितच रोग आणि आजार याविरूद्ध अत्यंत उच्च प्रतिकारक्षमता होती. त्यांच्या वंशजांस हे लाभ कमी प्रमाणात का असेंना, वारशाने लाभले असावेत. कालांतराने, पापाचा परिणाम म्हणून मानव आनुवंशिक संकेत वाढत्या प्रमाणात अपभ्रष्ट होत गेले, आणि मानव प्राणी मृत्यू व रोग यांस सहज बळी पडू लागले. याचा देखील परिणाम म्हणून आयुर्मान अतिशय कमी झाले असावे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

उत्पत्तीच्या काळातील लोक इतकी वर्षे का जगत?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *